शुन्य सावली दिवस म्हणजे काय? तुमच्या शहरात देखील पाहता येणार

पुणे : जेव्हा सुर्य बरोबर डोक्यावर असतो. तेव्हा आपली सावली पायाखाली सरळ पायाखाली पडते आणि जणू काही ती सावली गायब होते. त्याला शून्य सावली म्हणतात. वर्षातून दोनदा शून्य सावली दिवस निर्माण होतो. सूर्य बरोबर डोक्यावर आलेला अनुभवयाला मिळतो.

सूर्याची क्रांती ज्यादिवशी उत्तर १९ अंश होईल त्या दिवशी दुपारी सूर्य बरोबर डोक्यावर दिसेल. वर्षातून असा सूर्य दोनदा बरोबर डोक्यावर दिसतो. त्यामुळे या दिवशी माध्यान्हाला सूर्य डोक्यावर आल्यावर आपली सावली बरोबर पायाखाली आल्यामुळे दिसू शकत नाही म्हणून या दिवसाना ‘शून्य सावलीचा दिवस’ म्हणतात.

पृथ्वीवर मकर वृत्ताच्या दक्षिणेकडेच्या भागात तर कर्क वृत्ताच्या उत्तरेकडच्या भागात सूर्य कधीच डोक्यावर येत नाही. तो सदैव क्रमश: उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडेच दिसतो. पण कर्क वृत्ताच्या दक्षिण आणि उत्तर या दोन टोकांच्या वृत्तामधल्या लोकांना सूर्य बरोबर डोक्यावर आलेला अनुभवयाला मिळतो.

राज्यात कधी व कुठे दिसणार शुन्य सावली

 

१३ मे : लातूर

१४ मे : अलिबाग, दौंड, पुणे

१५ मे : मुंबई

१६ मे : नगर, कल्याण, नांदेड, ठाणे

१८ मे : पैठण

१९ मे : जालना

२० मे : औरंगाबाद, नाशिक

२१ मे : मनमाड

२२ मे : यवतमाळ

२३ मे : बुलडाणा, मालेगाव

२४ मे : अकोला

२५ मे : अमरावती

२६ मे : भुसावळ, जळगाव, नागपूर