24 तासात गृह विभागाने आदेश फिरवत भुसावळसाठी वर्धा पोलीस उपअधीक्षक कृष्णात महादेव पिंगळे यांची नियुक्ती

भुसावळ प्रतिनिधी l

भुसावळचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांची संगमनेर येथे बदली झाल्यानंतर धर्माबाद, जि.नांदेड उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक विक्रांत हिंमत गायकवाड यांची नियुक्ती गृह विभागाने मंगळवारी केली मात्र 24 तासात गृह विभागाने आदेश फिरवत भुसावळसाठी वर्धा पोलीस उपअधीक्षक कृष्णात महादेव पिंगळे यांची नियुक्ती केली तर भुसावळसाठी नियुक्त विक्रांत गायकवाड यांची सुधारीत आदेशानुसार जालना उपअधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.

24 तासात बदलीचे आदेश फिरवल्याने आल्याने गृह विभागावर टिकेची झोड उठली असून अधिकाऱ्यांच्या गोटातही मोठी खळबळ उडाली आहे. अनेक अधिकारी या आदेशाविरोधात मॅटमध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे