VIDEO: राहुल गांधींनी आदिवासी नृत्यावर धरला ठेका !

0

रायपुर: कॉंग्रेस नेते राहुल गांधी हे नेहमीच राजकारणात चर्चेत राहतात. आपल्या वादग्रस्त विधानामुळे ते आणि कॉंग्रेस पक्ष अडचणीत सापडतो. दरम्यान आता राहुल गांधी यांच्यातील एक वेगळाच व्यक्तिमत्व समोर आला आहे. छत्तीसगडमधील आदिवासी समाज बांधवांच्या एका कार्यक्रमात राहुल गांधींनी चक्क आदिवासी नृत्यावर ठेका धरला. गळ्यात आदिवासी वाद्य घेत राहुल गांधींनी नृत्य केले. लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमार यांनी देखील नृत्य केले.

राष्ट्रीय आदिवासी नृत्यू महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी राहुल गांधी उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी आदिवासी नृत्यावर ठेका धरला. यावेळी राहुल गांधी यांच्यासोबत कॉंग्रेस नेत्यांनी देखील नृत्य केले.

Copy