VIDEO: रक्षा बंधनाला लता दीदींचा मोदींना खास भावनिक संदेश

0

नवी दिल्ली: आज रक्षा बंधनाचा सण आहे. या सणाचे महत्त्व भारतात असाधारण आहे. मात्र यावर्षी कोरोनामुळे रक्षा बंधनच्या सणाला काही बंधने आली आहेत. दरम्यान गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना रक्षा बंधनाला खास संदेश पाठविला आहे. एका व्हिडिओच्या माध्यमातून लता दीदींनी मोदींना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आजच्या परिस्थितीमुळे ‘मी तुम्हाला राखी पाठवू शकली नाही, मीच नाही तर देशातील लाखो-कोटी महिलांचे तुम्हाला राखी बांधण्यासाठी हात पुढे आहे, मात्र ते शक्य नाही. परंतु तुम्ही भारताला यशोशिखरावर न्याल यासाठी आम्हाला वचन द्या,’ असे लता दीदींनी म्हटले आहे.

यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली असून लता दीदींचे आभार मानले आहे. “रक्षा बंधनच्या मुहूर्तावर आपला हा संदेश प्रेरणा आणि उर्जा देणारा आहे. देशातील करोडो माता-भगिनींच्या आशीर्वादाने देश उंच शिखरावर जाईल, आणि नवीन यश प्राप्त करेल. तुम्ही स्वस्थ रहा, आपल्याला दीर्घायुष्य लाभो यासाठी प्रार्थना” अशा शब्दात मोदींनी लता दीदींचे आभार मानले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे संबंध बहिण-भावाप्रमाणे राहिलेले आहे. दरवर्षी लतादीदी मोदींना राखी पाठवीत असतात. काही वेळा स्वत: भेट घेऊन देखील राखी बांधत असतात. मात्र यावर्षी कोरोनामुळे ते शक्य होऊ शकले नाही.