VIDEO: कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर केरळात हल्ला !

0

कन्नूर: कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडीयुरप्पा यांच्या ताफ्यावर केरळमध्ये हल्ला करण्यात आला आहे. कन्नूर येथे हा प्रकार घडला. कन्नूर येथील काही तरुणांनी काळे झेंडे दाखवत मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर हल्ला केला. सीपीआय-एमच्या युथ विंगमधील तरुणांनी हा हल्ला केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.

केरळमधील गुरुवायूर मंदिरांबरोबर स्थानिक धार्मिक ठिकाणांना भेट देण्यासाठी गेलेल्या येडियुरप्पा यांच्या ताफ्यातील गाडीवर अचानक हल्ला करण्यात आला. हा हल्ला झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या गाडीच्या चालकाने प्रसंगावधान राखत गाडी थांबवण्याऐवजी समोर आडव्या आलेल्या हल्लेखोरांना चुकवून गाडी वेगाने पळवली. त्यामुळे

केरळ भाजपाच्या ट्विटर अकाऊंटवरुन या हल्ल्याचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. “सीपीआय एम च्या युथ विंगने कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यावर असा भ्याड हल्ला केला. चालकाच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला. या दौऱ्या आधीच हल्ल्यासंदर्भातील धमक्या देण्यात आल्यानंतरही केरळ पोलिसांनी योग्य काळजी घेतली नाही,” असं या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Copy