वडोदराजवळ भीषण अपघात: ११ जण जागीच ठार

0

वडोदरा: गुजरातमधील सुरत-अहमदाबाद महामार्गावर वडोदराजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ११ जन जागीच ठार झाले आहे तर १७ जण जखमी झाले आहे. आज बुधवारी १८ रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. ट्रकनी कारला धडक दिल्याने हा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की यात कारचा अक्षरश: चुराडा झाला आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती गंभीर आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.

Copy