Private Advt

पादचारी महिलेच्या गळ्यातून चोरट्यांनी मंगलपोत लांबवली

जळगाव : पायी जाणार्‍या महिलेच्या गळ्यातील सोन्याची मंगलपोत दोन अज्ञात व्यक्तींनी हिसकावून पळ काढला. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गुरुवार, 10 रोजी रात्री साडेआठ वाजता ही घटना किसनराव नगरातील दत्त मंदिराजवळ घडली.

धूम स्टाईल चोर्‍या वाढल्या
जळगाव शहरातील विवेकानंद नगरातील रहिवासी सुनीता रवींद्र कापसे (51) या आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास असून गुरुवार, 10 मार्च रोजी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास त्या शतपावली करण्यासाठी बाहेर निघाल्या असता किसनराव नगरातील दत्त मंदिराजवळ दोन भामट्यांनी त्यांच्या गळ्यातील सहा ग्रॅम वजनाची व 15 हजार रुपये किंमतीची सोन्याची मंगलपोत तोडून लंपास केली. या प्रकरणी सुनीता कापसे यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्यानंतर शुक्रवारी रात्री उशिरा रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख करीत आहे.