भाजप आमदाराचा कोरोनामुळे मृत्यू

0

नवी दिल्ली : कोरोनामुळे दिग्गजांना जीव गमवावा लागले आहे. अनेक, आमदार, खासदार, राजकीय नेते, सेलिब्रिटी कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. दरम्यान उत्तराखंडमधील भाजपा आमदार सुरेंद्र सिंह जीना यांचे कोरोनामुळे निधन झाले. दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात आमदार सुरेंद्र सिंह यांच्यावर उपचार सुरू होते. सुरेंद्र सिंह हे अल्मोडा जिल्ह्यातील सल्ट मतदारसंघातून प्रतिनिधित्त्व करत होते. ते तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नीचे ह्रदयविकाराने निधन झाले होते.

आमदार सुरेंद्र सिंह यांना गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. यानंतर गेल्या दोन आठवड्यापासून दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्यांची तब्येत दिवसेंदिवस अधिक खालावत होती. गुरुवारी उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

सुरेंद्र सिंह हे 2006 मध्ये जीना कुमाऊं मंडळ विकास निगमच्या अध्यक्ष होते. 2007 मध्ये पहिल्यांदाच भिक्क्यासैंण या जागेवरून विधानसभेत आमदार म्हणून निवडून आले. 2012 रोजी पुन्हा सल्ट या विभागातून आमदार म्हणून निवडून आले. 2017 मध्ये पुन्हा एकदा त्यांनी विजय मिळवला होता. वयाच्या 50 व्या वर्षी सुरेंद्र सिंह यांचे कोरोनामुळे निधन झाले.

Copy