यूपी सरकारची मोठी घोषणा; प्रभू श्रीराम एअरपोर्टसाठी १०१ कोटींची तरतूद

0

लखनौ: अयोध्येत प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर साकार होणार आहे. मंदिर उभारणीचे कार्य सुरु झाले आहे. मंदिरासाठी देशभरातून निधी संकलन केले जात आहे. दरम्यान प्रभू श्रीरामांच्या नावाने अयोध्येत बांधकाम सुरु असलेल्या विमानतळासाठी निधीची घोषणा योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने केली आहे. आज सोमवारी उत्तर प्रदेश सरकारचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. यात अयोध्येतील ‘मर्यादा पुरषोत्तम श्रीराम’ विमानतळासाठी अर्थसंकल्पात १०१ कोटींची तरतूद करण्याची घोषणा करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशचे अर्थमंत्री सुरेश खन्ना यांनी अर्थसंकल्प मांडताना ही घोषणा केली.

Copy