यूपीत भाजप नेत्याची हत्या !

0

लखनऊ-उत्तर प्रदेशमधील बादशाहनगर येथे एका अज्ञाताने भाजप नेत्यावर चाकू हल्ला करत ठार केले. प्रत्यूष मणि त्रिपाठी (३४)असे भाजप नेत्याचे नाव आहे. त्रिपाठी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यापूर्वी त्यांचा मृत्यू झालेला होता.

या घटनेच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्त्यांनी तसेच त्रिपाठी यांच्या समर्थकांनी रुग्णालयाबाहेर घोषणा देत निदर्शने केली. पोलिसांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. वरिष्ठ अधीक्षक कलानिधि नैथानी यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली.

Copy