जळगाव अनलॉक, उद्यापासून अनेक गोष्टी उघडणार

मुंबई । राज्य सरकारने लॉकडाऊन शिथिल करण्यासाठी 5 टप्पे ठरवले आहेत. पहिल्या टप्प्यात ज्या जिल्ह्यात पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्के आहे आणि ऑक्सिजनची उपलब्धता 25 टक्क्यांच्या आत असेल तिथे सर्व गोष्टी सुरू होतील, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. पहिल्या टप्प्यामध्ये 18 जिल्हे असून, त्यामध्ये जळगाव व धुळे या जिल्ह्यांचाही समावेश आहे. पहिल्या टप्प्यात जमावबंदी राहणार नाही.

वडेट्टीवार म्हणाले की, पहिल्या टप्प्यात ठाणे, औरंगाबाद, लातूर, नांदेड, जालना, परभणी, बुलढाणा, नाशिक, जळगाव, धुळे, नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमधील निर्बंध हटवत लॉकडाऊन मागे घेण्यात आला आहेत. या नियमांची अंमलबजावणी शुक्रवारपासून सुरू राहणार आहे. ही अंमलबजावणी त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी करतील. दर शुक्रवारी याचा आढावा घेतला जाईल, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

काय होणार सुरू

– रेस्टॉरंट, मॉल्स
– गार्डन, वॉकिंग, ट्रेक
– खाजगी, सरकारी कार्यालये 100 टक्के सुरू होतील
– चित्रपट शूटिंग
– थिएटर
– सार्वजनिक कार्यक्रम, लग्न सोहळा यांना 100 टक्के सूट
– ई-कॉमर्स
– जिम, सलून
– बस 100 टक्के क्षमतेने
– आंतरजिल्हा प्रवास मुभा
– इतर राज्यातून येणार्‍यांवर काही निर्बंध असतील, त्याबाबतचे आदेश नंतर काढले जातील

लेव्हल 2 मधील जिल्ह्यात काय ?

दुसर्‍या लेव्हलमध्ये मुंबई, मुंबई उपनगर, नंदुरबार या जिल्ह्याचा समावेश आहे. मुंबईत आता सध्या लोकल सुरु होणार नाही. हा कोरोना पॉझिटीव्हीटीचा रेट कमी झाला तरच लोकल सुरू होईल, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

या जिल्ह्यांमध्ये 50 टक्के क्षमता रेस्टॉरंट सुरू, मॉल्स, थिएटर्स 50 टक्के, लोकल ट्रेन सुरु नाही, सार्वजनिक जागा, मैदाने, वॉकिंग ट्रॅक पूर्ण सुरू राहतील. बांधकाम पूर्ण सुरू, कृषी कामे पूर्ण, ई सेवा पूर्ण, जिम, सलून, स्पा, वेलनेस सेंटर 50 टक्के सुरू, बसेस बैठक क्षमता पूर्ण क्षमतेने सुरू होतील.

जिल्ह्याच्या बाहेर प्रायव्हेट कार, बसेस, लाँग ट्रेन, खासगी गाड्या, टॅक्सी यांना परवानगी देण्यात आली आहे, मात्र पाचव्या लेव्हलला जाण्यासाठी ई पास लागेल.

लेव्हल 3 मधील जिल्ह्यात काय ?

अत्यावश्यक दुकाने 7 ते 2 वाजेपर्यंत, इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार 7 ते 2 (शनिवार, रविवार बंद)

पहिल्या टप्प्यातील 18 जिल्हे

ठाणे, औरंगाबाद, लातूर, नांदेड, जालना, परभणी, बुलढाणा, नाशिक, जळगाव, धुळे, नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ

दुसर्‍या टप्प्यातील 6 जिल्हे

अहमदनगर, अमरावती, हिंगोली, मुंबई, मुंबई उपनगर, नंदूरबार

तिसर्‍या टप्प्यातील 10 जिल्हे

अकोला, बीड, कोल्हापूर, उस्मानाबाद, पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर

 

 

Copy