केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद ‘एम्स’मध्ये दाखल !

0

नवी दिल्ली- केंद्रीय कायदा व माहिती प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्यांना अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स)मध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर काही चाचण्या झाल्या असून त्यांना उपचारासाठी काही दिवस डॉक्टरांच्या निगरानी खाली ठेवले जाणार आहे.

६४ वर्षीय रवीशंकर प्रसाद यकृतसंबंधी आजाराने त्रस्त आहे. मोदी सरकारमधील ते दिग्गज मंत्री मानले जातात.