केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांना मातृशोक

0

नवी दिल्ली: केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या मातोश्री यांचे आज रविवरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या ८९ वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर मागील काही दिवसांपासून हृदयरोगाशी संबधित उपचार सुरू होते. डॉ. हर्ष वर्धन यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. डॉ. हर्ष वर्धन यांनी भावनिक पोस्ट करत, निधनाची माहिती दिली. आईच्या इच्छेनुसार तिच्या निधनानंतर तात्काळ तिचे नेत्रदान करण्यता आले असल्याचेही डॉ. हर्ष वर्धन यांनी सांगितले.

डॉ.हर्ष वर्धन यांनी ट्विटमध्ये आईसोबतचा फोटो देखील शेअर केला आहे. ” कळवताना अतिशय दुःख होत आहे की, पृथ्वीतलावरील माझी सर्वात प्रिय व्यक्ती, माझी आई स्वर्गवासी झाली. ती ८९ वर्षांची होती व आज सकाळी हृदय विकाराचा झटक्याने तिचे निधन झाले. माझ्यासाठी महान व्यक्तिमत्व, मार्गदर्शक आणि प्रेरणास्थानी असलेली माझी आई गेल्याने मी पोरका झालो, माझ्या आयुष्यात निर्माण झालेली उणीव कोणीही भरून काढू शकत नाही. तिच्या पवित्र आत्म्यास शांती लाभो असे डॉ.हर्ष वर्धन यांनी म्हटले आहे.

Copy