हरसिमरत कौर बादल यांचा राजीनामा मंजूर; खात्याची जबाबदारी या मंत्र्यांकडे

0

नवी दिल्ली: केंद्र सरकारने कांदा निर्णयातबंदीचा निर्णय घेतला आहे. या निर्यावरून केंद्र सरकारवर बरीच टीका होत आहे. सरकारमधीलच काही मित्र पक्ष तसेच स्वत: भाजपचे लोकप्रतिनिधी याला विरोध करत आहेत. दरम्यान केंद्र सरकारचे शेती आणि शेतकऱ्यांविरोधी भूमिका आहे असे आरोप केंद्र सरकारच्या निषेधार्थ मित्र पक्ष शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांनी काल गुरुवारी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मोदी सरकारला हा मोठा धक्का मानला जात आहे. राष्ट्रपतींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करून हा राजीनामा मंजूर केला आहे. हरसिमरत कौर यांच्याकडे अन्नप्रक्रिया उद्योगमंत्री पद होते. ते आता कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडे देण्यात आले आये.

शेतकरीविरोधी विधेयकांच्या निषेधार्थ मंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा हरसिमरत कौर बादल यांनी ट्वीटद्वारे केली. शेतकऱ्यांची बहीण, कन्या म्हणून त्यांच्या पाठीशी उभे राहिल्याचा मला अभिमान आहे, असे ट्वीट केले आहे.

हरसिमरत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चार पानी राजीनामापत्र पाठवून सरकारला लक्ष्य केले. शिरोमणी अकाली दलाने वारंवार विनंती करूनही केंद्र सरकारने या विधेयकांबाबत शेतकऱ्यांना विश्वासात घेतले नाही. शेतकऱ्यांच्या हितरक्षणाची आमच्या पक्षाची परंपरा असून, पक्षाचा प्रत्येक सदस्य शेतकरी आहे, असे हरसिमरत यांनी या पत्रात म्हटले आहे.

Copy