ठाकरे कुटुंबीय थोड्याच वेळात घेणार राम लल्लाचे दर्शन

0

अयोध्या –देशभरात सध्या शिवसेना राम मंदिराच्या निर्माणासाठी अयोध्येत गेली असल्याची एकच चर्चा सुरु आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काल सहकुटुंब अयोध्येत दाखल झाले आहेत. राम मंदिराच्या उभारणीसाठी राम जन्मभूमीवर शिवसैनिकांनी गर्दी केली असून उद्धव ठाकरे आज थोड्याच वेळात रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर अयोध्येत कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे लक्ष्मण किला येथे दाखल झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याच्या आजचा दुसरा दिवस आहे. आज दुपारी उद्धव ठाकरे मुंबईला परतणार आहे.

Copy