Private Advt

दुचाकीला ट्रकची जोरदार धडक ; 55 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

जनशक्ती न्यूज| शिरपूर | मध्यप्रदेश राज्यतून लग्न कार्य आटोपून गावाकडे दुचाकीने परतणाऱ्या व्यक्तीच्या दुचाकीला शिरपूर तालुक्यातील पळासनेर शिवारात महामार्गावर ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रकने मागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाल्याची घटना रविवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास घडली आहे.या अपघातात माधवराव भिका कोळी रा.नवे भामपूर ता.शिरपूर हे जागीच मयत झाले.
              शिरपूर तालुक्यातील नवे भामपूर येथील माधवराव भिका कोळी व जगन्नाथ माधवराव कोळी हे पितापुत्र मध्यप्रदेशातील सोलवन, ता.वरला जि बडवानी येथे एमएच 15 एचएन 8753 या दुचाकीने लग्न कार्यसाठी रविवारी सकाळी गेले होते.लग्न कार्य आटोपुन परत येत असताना तालुक्यातील महामार्गावर पळासनेर हॉटेल रंगीला राजस्थान समोर सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास एम एच 18 बीए 3448 या ट्रकवरील चालकाने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात मागून जोरदार धडक दिली या धडकेत माधवराव भिका कोळी यांच्या डोक्यावरून चाक गेल्याने जगूच मृत्यू झाला तर जगन्नाथ माधवराव कोळी या किरकोळ दुखापत झाली.अपघातानंतर ट्रक चालक अपघात स्थळावरून पसार झाला.तर महामार्गावर अम्ब्युलन्सने मृतदेह शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला.याप्रकरणी जगन्नाथ माधवराव कोळी यांनी तालुका  पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून सदर ट्रकवरील आज्ञात चालकाविरुद्ध रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
2 Attachments