ब्राह्मण विरोधी पोस्टरमुळे ट्रोल झाले ट्वीटरचे सीईओ

0

नवी दिल्ली- माइक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटरचे सीईओ जैक डोरसी ब्राह्माण विरोधी पोस्टरमुळे वादात सापडले आहे. ट्विटरवर एक पोस्ट व्हायरल होत आहे त्यात डोरसी एक पोस्टर घेऊन उभे आहे. त्यात “ब्राह्माण पितृसत्ता का नाश हो”असे लिहिलेले आहे.

यावरून डोरसी यांनी माफी देखील मागितली. मात्र डोरसी चांगलाच ट्रोल झाला आहे. मागील आठवड्यात डोरसी भारतात आले होते. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, दलाई लामा यांची भेट घेतली होती. तसेच त्यांनी भारतीय महिला कार्यकर्त्या आणि पत्रकारांची भेटही घेतली होती. यावेळी त्यांनी ब्राह्मण विरोधी पोस्टर हातात घेतले होते.

Copy