आज मुंबई-हैद्राबाद आमने-सामने: मुंबईची प्रथम फलंदाजी

0

दुबई:आज रविवारी शाहजाह स्टेडियमवर मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि सनरायजर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) यांच्यात सामना आहे. रोहित शर्माने अर्थात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. मुंबईने मागील सामन्यात पंजाबचा ४८ या मोठ्या धावसंख्येने पराभव करत प्रथम स्थानी मजल मारली होती. मात्र आता मुंबई तिसऱ्या स्थानावर आहे. मागील सामन्यात बलाढ्य अशा चेन्नई संघाला नमवून हैद्राबाद चौथ्या स्थानी आहे. त्यामुळे आजचा सामना तगडा होणार यात शंका नाही. मुंबईने चार सामन्यांपैकी दोन सामन्यांमध्ये विजय मिळविले आहे. आयपीएलच्या सलामी सामन्यात मुंबईचा पराभव झाला होता.

अशी आहे टीम
मुंबई: रोहित शर्मा, क्विंटन डी’कॉक, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पांड्या, किरॉन पोलार्ड, कृणाल पांड्या, जेम्स पॅटिन्सन, राहुल चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह

हैद्राबाद: डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेअरस्टो, मनीष पांडे, केन विलियम्सन, प्रियांक गर्ग, असद समद, एस शर्मा, राशीद खान, सिद्धार्थ कौल, टी नटराजन

Copy