धवन, रोहितला कोहलीचा रेकॉर्ड मोडण्याची संधी !

0

ब्रिस्बेन-भारतीय संघाचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी यंदा चमकदार कामगिरी केली आहे. या दोघांनी भारताला अनेक सामन्यांत चांगली सुरुवात करुन दिली आहे आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही ते सातत्यपूर्ण कामगिरीचा प्रयत्न करतील अशी आशा आहे.

या वर्षात ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा धवनच्या नावावर आहेत. धवनला कोहलीचा एका वर्षात सर्वाधिक ट्वेंटी-२० सामन्यातील धावांचा विक्रम मोडण्याची संधी आहे. रोहितलाही संधी आहे. त्यामुळे आज होणाऱ्या सामन्यात कोण आघाडी घेत हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.