हे माजी मुख्यमंत्री अद्यापही राहतात सरकारी बंगल्यात

0

लखनौ-उत्तर प्रदेशातील ज्या ६ माजी मुख्यमंत्र्यांनी आद्यापही सरकारी बंगले सोडलेले नाहीत. मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर अद्यापही सरकारी निवासस्थानात आपले ठाण मांडून बसलेल्यांमघ्ये मुलायम सिंह यादव, अखिलेश यादव, मायावती, एन.डी.तिवारी, कल्याण सिंह आणि राजनाथ सिंह यांचा समावेश आहे. त्यांना सुप्रीम कोर्टाने नुकतेच फटकारले होते. यापार्श्वभूमीवर युपी सरकारने त्यांना नोटीसा पाठवल्या आहेत. या नोटिसनुसार, यासाठी त्यांना पुढील १५ दिवसांत अवधी देण्यात आला आहे.

दुसरा पर्याय काढण्याची विनंती

सरकारी निवासासाठी या लोकांना नाममात्र भाडे अदा करावे लागते. यावरच सुप्रीम कोर्टाने म्हटले होते की, पदावरून दूर गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांना सरकारी बंगले दिले जाणे योग्य नाही, त्यामुळे त्यांच्याकडून बंगले खाली करवून घ्यावेत अशा स्पष्ट सुचना कोर्टाने राज्य सरकारांना दिल्या आहेत. दरम्यान, समाजवादी पार्टीचे नेते मुलायम सिंह यादव यांनी बुधवारी मुख्यंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊन त्यांचा बंगल्यातील मुक्काम कायम राहण्यासाठी दुसरा पर्याय काढण्याची विनंती केली होती.

Copy