उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढतोय; कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नका

पुणे : राज्यातील उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. अशातच सर्वाधिक तापमान हे पुण्यात आहे. वाढत्या तापमानाच्या पार्श्ववभूमीवर हवामान विभागाने पुढील तीन ते चार दिवस सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सर्व पुणेकरांना हायड्रेट राहण्याचं आवाहन केलं आहे.

भारतीय हवमान विभागाने लोकांना उष्माघातापासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देखील दिला आहे आणि दुपारी कामाव्यतिरिक्त घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. मागील काही दिवसांपासून पुण्यात तापमानात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपुर्वी ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मगरपट्टा, लवळे, कोरेगाव या सर्व ठिकाणी ४० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. लोणावळा जिल्ह्यात ३४.५ कमाल तापमानाची नोंद झाली असून इतर सर्व भागांमध्ये ३५ ते ४० अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे.