Private Advt

शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेली तरतूद ही महत्वाची – एकनाथराव खडसे

सर्वसमावेशक अर्थसंकल्प

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचा काळ सुरू असल्याने अर्थव्यवस्थेवर आर्थिक ताण आला होता. असं असतानाही राज्य शासनाने सर्वसमावेशक व संपूर्ण जनतेचा हिताचा असा अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेली तरतूद ही वाखाणण्याजोग आहे. या तरतुदीमुळे संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे त्याच बरोबर शिक्षण क्षेत्रात देखील करण्यात आलेली तरतूद ही महत्त्वाची आहे.अशी प्रतिकिया एकनाथराव खडसे यांनी दिली

 

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत महाविकास आघाडी सरकारचा राज्य अर्थसंकल्प सादर केलाया अर्थसंकल्पाचे महाविकास आघाडीच्या
सत्ताधारी लोकप्रतिधिंनी स्वागत केले आहे. तर प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या आमदारांनी व माजी मंत्र्यांनी अर्थसंकल्पावर सडकून टीकाच
केली आहे.

 

अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा अर्थहीन असून भारतीय जनता पक्षाच्या काळात ज्या योजना राबवल्या गेल्या त्याच योजनांची नावे बदलण्याचा केविलवाणा प्रयत्न अर्थमंत्र्यांनी केल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. शेतकरी, उद्योजक व सर्वसामान्य नागरिक यांना कुठलाही कुठल्याही प्रकारचा फायदा या अर्थसंकल्पातून होणार नाहीये. यामुळे राज्य शासनाने सादर केलेला अर्थसंकल्प हा अर्थहीन आहे.अशी प्रतिकिया खासदार रक्षा खडसे यांनी दिली.

उत्तर महाराष्ट्राला काहीही मिळालं नाही -खा. उन्मेष पाटिल

महाराष्ट्र विधानसभेत सादर झालेल्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पातून उत्तर महाराष्ट्राला काहीही मिळालेले नाही. सिंचनापासून ते शेतकऱ्यांपर्यंत कोणाचाही प्रश्न हा अर्थसंकल्प हे सरकार सोडवू शकले नाही. किंबहुना त्यासाठी सरकारने उदासीन भूमिका बजावली आहे.मात्र केवळ ठराविक लोकांचे भले व्हावे यासाठी हा अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे.अशी प्रतिक्रिया खासदार उन्मेष पाटील यांनी दिली.

 

 


शेतकऱ्यांना न्याय देणारा अर्थसंकल्प – आ . लता सोनवणे

महाविकास आघाडीचा हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना न्याय देणारा अर्थसंकल्प असून सर्वच घटकांना सोबत घेऊन चालणारा सर्वसमावेशक असा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पामुळे शेतकऱ्यांना पाठबळ मिळणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य शासनाने कित्येक योजना आणल्या आहेत ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य होणार आहे.


निराशाजनक अर्थसंकल्प – आ. संजय सावकारे

अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेला अर्थसंकल्प अतिशय निराशाजनक असून कोणतीही सर्वसमावेशक अशी तरतूद यात नाही. शेतकऱ्यांपासून ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत या अर्थसंकल्पामुळे कोणाचेही भले होणार नाही. उलट केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पाच्या योजनाच या अर्थसंकल्पात मांडण्यात आल्या आहेत.

शेतकऱ्यांचा अर्थसंकल्प – आ. अनिल भाईदास
राज्य शासनाने सादर केलेला अर्थसंकल्प खऱ्या अर्थाने शेतकर्‍यांचा अर्थसंकल्प आहे. राज्याच्या विकासाचे पंच सूत्र या अर्थसंकल्पातून मांडण्यात आले आहेत. कृषी विभागासाठी राबवण्यात येणार असलेल्या विविध योजना त्या अनुसरून विणण्यात येणारे ग्रामीण रस्ते यासाठी अर्थमंत्री अजित पवार
यांचे खऱ्या अर्थाने आभार. अर्थसंकल्पामुळे शेत शिवाराचे रस्ते चांगले होणार असून यामुळे शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने आधुनिक बनणसाठी मदत होणार आहे.

विकासाभिमुख अर्थसंकल्प -आ. चिमणराव पाटील
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीचा अर्थसंकल्प आज मांडला हा खऱ्या अर्थाने विकासाभिमुख अर्थसंकल्प आहे आणि या अर्थसंकल्पामुळे आरोग्य शिक्षण या क्षेत्रांमध्ये मोठी तरतूद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांसाठी विशेष योजनांचा समावेश या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आला आहे. महाराष्ट्राचा भविष्य काळ लक्षात घेता त्याचा विचार करता हा अर्थसंकल्प फार महत्त्वाचा ठरणार असून भविष्याचा वेध घेणारा हा अर्थसंकल्प आहे.