52 गावातील प्रवाशांची मदार अवघ्या 45 बसेसवर

0

भुसावळ : भुसावळातील एस.टी. आगारात 54 बसेस असून यापैकी सहा बसेस आरटीओ कार्यालयात जमा असून दोन बसेस अपघातग्रस्त झाल्या आहेत तर एक बस स्पेअर पार्टअभावी नादुरूस्त असल्याने आगारातून केवळ 54 बसेस प्रवाशांना घेवून मार्गावर धावत आहेत. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. रेल्वेच्या जंक्शन स्थानकालगतच बसस्थानक असल्याने बसस्थानकावर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते मात्र बसस्थानकावर पुरेशा बसेस उपलब्ध नसल्याने प्रवाशांना बाहेर गावी गेलेली बस परत येण्याची प्रतीक्षा करावी लागते तसेच भुसावळ तालुक्यातील 52 गावांपैकी 39 ग्रामपंचायती असून वरणगावचे नगरपरीषदेत रूपातंर झाले आहे.

सहा बसेस आरटीओ अधिकार्‍यांकडे

ग्रामीण भागातील प्रवाशांना बसेसची सुविधा देण्यासाठी बस आगारात परीवहन महामंडळाकडून 54 बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या असल्यातरी सहा बसेस उपप्रादेशिक परीवहन अधिकारी जळगाव यांच्या कार्यालयात पडून आहेत. दोन बसेस अपघातग्रस्त असल्याने त्या वरणगाव रोडवरील आगारात लावून ठेवण्यात आल्या आहेत तसेच एक नादुरूस्त झालेली बसही स्पेअर पार्टसच्या प्रतीक्षेत आगारात उभी ठेवण्यात आली आहे. यामुळे आगारातील 45 बसेसच्या माध्यमातून प्रवाशांचा मार्ग सुकर करणे बसस्थानक प्रशासनाच्या आवाक्याबाहेर होत आहे.परीणामी प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे मात्र बसस्थानक आगार प्रमुखांकडून प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या उपाययोजनांना प्राधान्य दिले जात नसल्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

बसेस अभावी अवैध वाहतुकीला ऊत

बसस्थानकात वेळेवर बसेस उपलब्ध होत नसल्याने प्रवाशांना बाहेरगावी गेलेल्या परतीच्या बसची प्रतीक्षा करावी लागते. यामुळे प्रवाशांच्या वेळेचा अपव्यय होत असल्याने बहुतांश प्रवाशी खासगी वाहनांचा आधार घेवून आपल्या प्रवासाचा मार्ग सुकर करीत असल्याने प्रवाशांचा कल दिवसेंदिवस खासगी प्रवासी वाहनांकडे वाढला आहे. परीणामी आगारातील उत्पन्नाला याचा फटका सहन करावा लागत आहे मात्र आगार प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारच्या उपाययोजनांना प्राधान्य दिले जात नसल्याने आगार प्रशासनाच्या कारभाराविषयी शंका निर्माण होत आहे.

Copy