Private Advt

तरुणाईत बॉडी बिल्डिंगसह ‘फिटनेस जिम’ची क्रेझ वाढली

नंदुरबारला पत्र परिषदेत आकाश पाने यांची माहिती

 

नंदुरबार। सध्याच्या बदलत्या युगात तरुणाईसाठी फिटनेस व बॉडीबिल्डिंगला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. शारीरिक दृष्ट्या फिटनेस व बॉडीबिल्डिंग महत्वाचे आहे. तरुणांनी भविष्यासाठी जिमला वेळ द्यावा. तसेच सध्या तरुणांमध्ये बॉडी बिल्डिंगसह ‘फिटनेस जिम’ची क्रेझ वाढली असल्याची माहिती स्काय फिटनेस जिमचे संचालक आकाश पाने यांनी दिली. नंदुरबार शहरातील गिरीविहार गेटजवळ असलेल्या स्काय फिटनेस जिमचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी बॉडी बिल्डिंगचे मार्गदर्शक योगेश निकम, सामाजिक कार्यकर्त्या सुलभा महिरे, नागसेन पेंढारकर आदी उपस्थित होते.

शरीरसौष्ठव क्षेत्रात बॉडी बिल्डिंगला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. त्यासाठी तरुणांकडून फिटनेस व बॉडी बिल्डिंग या दोन्ही प्रकारांना महत्त्व दिले जात आहे. यामुळे तरुणाईतील व्यसनाधिनताही कमी होण्यास मदत होते. कारण फिटनेस, बॉडी बिल्डिंगची आवड निर्माण झाल्यावर तरुण व्यसनमुक्त होतील. बॉडी बिल्डिंग व फिटनेस या दोन्ही बाबींमध्ये जिम करण्याबरोबर आहाराला विशेष महत्व असते. म्हणून बॉडी बिल्डिंग करताना तरुणांना विशेष मार्गदर्शन करून योग्य आहार घेण्याबाबत सांगितले जाते. सध्या आजच्या तरुणाईत बॉडी बिल्डिंगची क्रेझ मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. म्हणूनच नंदुरबार शहरात फिटनेस जिम सुरू होत आहे. सुरुवातीला स्काय फिटनेस जीमपासून अनेक तरुणांनी बॉडी बिल्डिंगला सुरुवात केली असल्याची माहिती आकाश पाने यांनी दिली. बॉडी बिल्डिंग करताना तरुणांनी कोणती काळजी घ्यावी व कशा पद्धतीने शरीर क्षेत्रात आपण करिअर करू शकतो, याविषयी बॉडी बिल्डिंगचे मार्गदर्शक योगेश निकम यांनीही माहिती दिली.