देश इस्त्रोच्या पाठीशी : नरेंद्र मोदी

0

बंगळूरु: चांद्रयान मिशन २ मोहिमेला शेवटच्या क्षणी मोठा धक्का बसला. चंद्रापासून २. १ किमीच्या अंतरावर असतांना चंद्रापासून विक्रम लँडरचा संपर्क तुटला. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या क्षणाचे साक्षीदार होत सर्व शास्त्रज्ञांना धीर देत, देश इस्रोच्या पाठीशी असल्याचे म्हटले आहे. तसेच, इस्रोच्या शास्त्रज्ञांचे कौतुक करत, देशाच्या प्रगतीमध्ये शास्त्रज्ञांचे मोठे योगदान असून, ते योगदान कुणी विसरू शकणार नसल्याचा निर्वाळा दिला आहे.

अडचणीमुळे आमचा आता अधीक आत्मविश्वास वाढला आहे. तसेच आपल्या हाती, लवकरच चांगला निकाल लागणार येणार आहे. आपल्या देशाचा इतिहास उज्वल असून , हार पत्करण्याची आपली संस्कृती नाही असे म्हटले आहे. चांद्रयान २ मोहिमेचा अखेरचा टप्पा अपेक्षेनुसार झाला नसला तरी त्याचा प्रवास उत्कृष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

‘होप फॉर द बेस्ट’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका वाक्याने इस्रोतील शास्त्रज्ञाना तसेच देशातील जनतेला नवी उर्जा देणारे ठरले आहे. चांद्रयान २ मोहिमेतील शेवटच्या टप्प्यात असताना संपर्क तुटल्याने देशवासियांची निराशा झाली होती. त्या, नंतर नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञाचे मनोबल वाढवले आहे.

Copy