मंदिराच्या खाली आढळली तीन मजली इमारत

0

वेरावल – देशातील 12 ज्योतिर्लिंगांमध्ये स्थान असलेल्या सोमनाथ Somnath महादेव मंदिराच्या खालील बाजूस जमिनीत एल आकाराची तीन मजली पुरातन इमारत असल्याचे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे. आयआयटी, गांधीनगर व पुरातत्त्व विभाग यांनी मिळून हे सर्वेक्षण केले आहे. यासंदर्भात साधारण एक वर्षापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्देश दिले होते.

पुरातत्व विभागाने आपल्या 32 पानांच्या अहवालात माहिती दिली आहे. त्यात म्हटले आहे की, मंदिराच्या खाली एल आकारात एक इमारत आहे. सोमनाथ मंदिराच्या दिग्विजय प्रवेशद्वारापासून काही अंतरावर बौद्ध गुंफाही आहेत. जमिनीच्या खाली 12 मीटरवर जीपीआर शोधात ही माहिती मिळाली आहे. आयआयटी, गांधीनगर आणि पुरातत्व विभाग यांनी 2017 मध्ये शोधून काढले होते की, सोमनाथ महादेव मंदिराच्या खाली भूगर्भात तीन मजली एल-आकाराची इमारत दबलेली आहे. त्यानंतर सोमनाथ मंदिर ट्रस्टच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रभास पाटण आणि सोमनाथमध्ये पुरातत्व विभागाला संशोधन करण्याचा सल्ला दिला होता.
आयआयटी, गांधीनगरने आपला अहवाल सोमनाथ ट्रस्टकडे सुपूर्द केला आहे. त्यानुसार सोमनाथ आणि प्रभास पाटणच्या एकूण चार भागात जीपीआरद्वारे शोध घेतला गेला. या कामासाठी 5 कोटींपेक्षा अधिक रकमेच्या मशिन वापर करण्यात आला. 2 मीटरपासून ते 12 मीटरपर्यंत भूगर्भात शोध घेतला गेला. गुजरातच्या वेरावलमध्ये सोमनाथ महादेव मंदिराची निर्मिती चंद्रदेवाने केला. या मंदिरावर इतिहासात अनेकवेळा आक्रमण झाली आहेत. मोहम्मद गझनवी यानेही या मंदिराची नासधूस केली होती.

Copy