तेलंगणामध्ये वायएसआर कॉंग्रेस २5-३० जागांवर लढणार

0

हैदराबाद- आगामी तेलंगाना विधानसभा निवडणुकीत वायएसआर काँग्रेस 25 ते 30 जागांवर निवडणूक लढविणार आहे. वायएसआर कॉंग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने ही माहिती दिली. ते म्हणाले की पक्षाची अद्याप कोणत्याही पक्षाशी युती झालेली नाही.

निवडणूक आयोगाने 6 ऑक्टोबर रोजी तेलंगानासह पाच राज्यांसाठी निवडणूक वेळापत्रक जाहीर केले आहे. 7 डिसेंबर रोजी निवडणुका होणार आहे. ६ सप्टेंबर रोजी तेलंगाना विधानसभा विसर्जित करण्यात आली.
पक्षाने तेलंगाना राज्यातील “ग्राउंड रिपोर्ट” तयार केले असून पक्षाचे अध्यक्ष वाईएस जगन मोहन रेड्डी यांना सादर करण्यात आले आहे. पक्ष अध्यक्ष जगन मोहन रेड्डी यांच्या निर्देशानंतर उमेदवारांची घोषणा केली जाणार आहे. विजया दशमी नंतर उमेदवार निश्चित केले जाणार आहे असे वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष गट्टू श्रीकांत रेड्डी यांनी सांगितले.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला 6.5 लाख मते मिळाली होती.

Copy