उष्माघातापासून बचावासाठी उपाययोजना करा जिल्हाधिकारी

| धुळे प्रतिनिधी । आगामी काळात उष्णतेची लाट अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उष्माघातापासून बचावासाठी सर्व संबंधित कराव्यात, अशा सुचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केल्या. त्या उपाययोजना विभागांनी आवश्यक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात जिल्हाधिकारी शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

बैठकीला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अश्विनी पवार, महापालिका आयुक्त देविदास टेकाळे, उपवनसंरक्षक नितिनकुमार सिंग, प्रशिक्षणार्थी सहाय्यक जिल्हाधिकारी सत्यम गांधी, निवासी उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर, उपजिल्हाधिकारी सुरेखा चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संतोष नवले, शिक्षणाधिकारी माध्यमिक मोहन देसले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. आगामी काळात पाण्याची टंचाई जाणवण्याची शक्यता लक्षात घेऊन आतापासूनच पाण्याचे नियोजन करावे. नागरिकांनीही पाण्याचा जपून वापर करावा. पाण्याच्या अनावश्यक वापर टाळावा. शेतकऱ्यांनी पशु, पक्षी व जनावरांची काळजी घ्यावी. नागरिकांनी पक्ष्यांसाठी घराबाहेर पाणी ठेवण्याचे आवाहन केले आहे.