ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावर आरोप आणि नाराजीचे सावट !

0

मुंबई: आज महाविकास आघाडीच्या सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादीकडून ३६ आमदार शपथ घेणार आहे. शिवसेनेने आपल्या गोटातून काही अपक्ष आमदारांनाही मंत्रीपद दिले आहे. दरम्यान या शपथविधीवर आरोप आणि नाराजीचे सावट दिसून येत आहे. कारण महाविकास आघाडीचे मित्रपक्ष असलेल्या पक्षांना शपथविधीसाठी निमंत्रण देण्यात आलेले नसल्याने ते शपथविधीला जाणार नाही तसेच भाजपने महाविकास आघाडीच्या सरकारने फसवी कर्जमाफी केल्याचे आरोप करत मंत्रीमंडळ विस्तारावर बहिष्कार टाकला आहे.

ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारत उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार तर आदित्य ठाकरे कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेणार आहे.

Copy