काळा पैसा: भारतातील दोन कंपन्या व तीन जणांचे नावे देण्यास स्विस सरकारची सहमती

0

नवी दिल्ली-कालेधन साठवणुकीसाठी प्रसिद्ध असलेली स्विस बँक आता आपली प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहे. स्वित्झर्लंड सरकार भारतातील दोन कंपनींचे नावे देण्यास तयार आहे. दोन कंपन्या आणि तीन लोकांचे नावे भारताला देण्याची तयारी स्विस सरकारने दर्शविली आहे. काळ्या पैशाच्या मुद्द्यावरून भारतातील कंपन्या आणि काही लोकांविरोधात कारवाई सुरु आहे. भारताकडून स्विस सरकारला नावे जाहीर करण्याची मागणी केली जात आहे.

भारतातील या दोन्ही कंपन्या सेबीच्या रडारवर आहे. दुसरी कंपनी तामिळनाडू राज्यातील काही राजकीय नेत्यांशी संबंधित आहे.

जियोडेसिक लिमिटेड कंपनीशी संबंधित तीन जण आहे. त्यात पंकज कुमार, ओंकार श्रीवास्तव, प्रशांत शरद मुलेकर आणि किरण कुलकर्णी यांच्याबाबत माहिती देण्यास तयारी दर्शविण्यात आली आहे.