विज बिलांवरुन भाजप आक्रमकः अखेर विज तोडणीला स्थगिती

मुंबईः राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे दुसरे दिवस आहे. आज अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा होणार आहे. आज विजबीलावरुन भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. विज बिलावरुन भाजपने राज्य सरकारला चांगलेच लक्ष केले आहे. विज बिल भरले जात नसल्याने पुरवठा खंडीत केले जात आहे. याच्या निषेधार्थ भाजपच्या आमदारांनी आज मंगळवारी विधान भवनासमोर पायर्‍यांवर बसून आंदोलन केले. पायर्‍यांवर ठिय्या मांडून सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान वीज बिलांच्या मुद्द्यावर सभागृहात चर्चा होत नाही तोवर राज्यातील शेतकरी व घरगुती वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई होणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

शेतकर्‍यांचे कृषीपंप आणि वीज ग्राहकांच्या थकबाकीसंदर्भात विधीमंडळात चर्चा होऊन निर्णय होईपर्यंत कुणाचीही वीज जोडणी तोडू नये, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंगळवारी विधानसभेत दिले. उपमुख्यमंत्र्यांच्या विधीमंडळातील निर्देशानंतर संबंधीत यंत्रणांना वीजतोडणी तात्काळ थांबवण्यास सांगण्यात आले आहे. पमुख्यमंत्र्यांच्या विधीमंडळातील निर्देशानंतर संबंधीत यंत्रणांना वीजतोडणी तात्काळ थांबवण्यास सांगण्यात आले आहे.

विधीमंडळ अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी विधानसभेत थकबाकीसंदर्भात उपस्थित मुद्याला उत्तर देताना, उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, वीजबिलांच्या थकबाकीसंदर्भात विधीमंडळात चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे. चर्चा होऊन दोन्ही बाजूंच्या सभासदांचे समाधान होईपर्यंत राज्यातील कृषीपंप आणि ग्राहकांची वीज जोडणी तोडण्यात येणार नाही. राज्यातील वीजथकबाकीसंदर्भात विशेष बैठक आयोजित करुन चर्चा करण्याची सरकारची तयारी असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्र्यांच्या या निर्देशाबद्दल विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

Copy