राहुल गांधीना सुरत कोर्टाचा दिलासा

0

गुजरात: लोकसभा निवडणूक २०१९ च्या आपल्या प्रचारात कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करतांना, सगळे ‘मोदी नावाचे लोक चोर का आहेत’ अशी टिप्पणी केली होती. त्या विरोधात राहुल यांच्या विरोधात सुरत कोर्टात तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी राहुल आज सुरत कोर्टात हजर झाले होते. त्यांनी या प्रकरणातून कायम सुट मिळण्यासाठी अर्ज दाखल केला आहे.

कोर्टाने त्यांच्या अर्जावर निर्णय राखून ठेवत पुढील सुनावणी १० डिसेंबर दिली आहे. तात्काळ तरी या प्रकरणातून राहुल यांना दिलासा मिळाला असल्याचे बोलले जात आहे.

Copy