ऑस्ट्रेलियन फलंदाजांकडून धुलाई; भारतासमोर मोठे आव्हान

0

सिडनी: भारत-ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या कसोटी मालिकेचा दुसरा सामना सध्या सुरु आहे. सिडनीत सुरु असलेल्या सामन्यात टीम इंडियाकडून निराशाजनक कामगिरी सुरु आहे. स्टिव्ह स्मिथने भारतीय गोलंदाजांची जोरदार धुलाई करत शतक ठोकले आहे. स्मिथने ६४ चेंडूत १०४ धावा पटकावल्या. स्मिथने केलेल्या खेळीत १४ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. या शतकी खेळीच्या जोरावर स्टिव्ह स्मिथ भारताविरुद्ध सलग पाच वन-डे सामन्यांत ५० किंवा त्यापेक्षा जास्त धावा काढणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. २०१४ साली न्यूझीलंडच्या केन विल्यमसनने भारताविरोधात केली होती.

भारतासमोर विजयासाठी ३९० धावांचे डोंगर उभे आहे. आव्हानात्मक धावसंख्या भारतीय संघ पूर्ण करेल का? याकडे आता लक्ष लागले आहे.

अॅरोन फिंच आणि डेव्हिड वॉर्नरच्या जोडीने पुन्हा एकदा भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. १४२ धावांचा भक्कम पाया रचल्यानंतर दोन्ही सलामीवीर मागोमाग तंबूत परतले. त्यानंतर स्टीव्हन स्मिथ आणि मार्नस लाबुशेन यांनी शतकी भागीदारी केली.

Copy