मोठी बातमी: परीक्षा ऑफलाईनच होणार: शिक्षणमंत्र्यांची घोषणा

मुंबई: कोरोनामुळे राज्यातील शाळा, महाविद्यालयांच्या परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन होणार? याबाबत संभ्रमावस्था होती. दरम्यान राज्याचे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी परीक्षेबाबतची मोठी घोषणा केली आहे. राज्यातील परीक्षा ह्या ऑफलाईन पद्धतीनेच होणार असल्याची घोषणा शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. त्यामुळे परीक्षेबाबतचा संभ्रम दूर होणार आहे.

माजी मंत्री सुधीर मुंनगंटीवार, माजी मंत्री आशिष शेलार यांनी विधिमंडळ अधिवेशनात परीक्षेविषयीचा प्रश्न उपस्थित केला. यावेळी त्यांनी ही घोषणा केली. परीक्षा ह्या शाळेतच घेतल्या जाणार असून कोरोनाची सर्व खबरदारी घेतली जाणार आहे असेही शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.