महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हान यांनी दाखवली राजीनाम्याची तयारी

0

मुंबई: लोकसभेच्या कॉंग्रेससाठी आलेल्या धक्कादायक निकालानंतर कॉंग्रेस पक्षात राजीनामा सत्र सुरु झाले आहे. काल उत्तरप्रदेशचे प्रभारी राज बब्बर यांनी आपला राजीनामा कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या कडे सोपवला होता. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही राजीनामा देण्याची तयारी दर्शवली असून, देशात ज्याठिकाणी कॉंग्रेसपक्ष पराभूत झाला असेल त्या ठिकाणचे प्रभारी यांनी राजीनामा द्यायला पाहिजे असेही ते म्हणाले आहे.

लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाची देशात पिछेहाट झाली आहे. राज्यात कॉंग्रेस पक्षाला फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. राज्यात कॉंग्रेस- राष्ट्रवाडी कॉंग्रेस पक्षाची धूळधाण उडाली आहे. राज्यातील कॉंग्रेसचे दिग्गज माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण याना पराभवाचा सामना करावा लागला आहे . या पराभवाची जबाबदारी म्हणून अशोक चव्हाण यांनी आपला राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे.

आज होत असलेल्या कार्यकारीणीच्या बैठकीत कॉंग्रेस चे अधुय्क्ष राहुल गांधी आपला राजीनामा देणार आहे असे बोलले जात आहे, त्यावर अशोक चव्हाण म्हणाले कि राहुल गांधी यांनी आपला राजीनामा देऊ नये, त्यांनी दिला तरी तो स्वीकारला जाऊ नये अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली.