हुडी बाबाSSS…उणे 15 तापमानात अंगावर केवळ टी-शर्ट!

0

लेह । थंडीत तापमानाचा पारा घसरायला लागला म्हणजे बंद घरातही अनेकांना हुडहुडी भरते परंतु, ऐकून धक्का बसेल. लेहमधील संशोधक सोनम वांगचुक हे उणे 15 अशा तीव्र थंडीतही केवळ अंगावर टी-शर्ट परिधान करून आपल्या घरात आरामात राहात आहेत.
थ्री इडियट चित्रपटात आमीर खानने रणछोडदास श्यामलदास चंचड उर्फ रांचो हे पात्र साकारले होते. रांचोचे हे पात्र लेहमधील संशोधक सोनम वांगचुक यांच्यासारखे आहे. ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी लेहमधील उणे 15 डिग्री तापमानाचे फोटो काढले आहेत. काश्मीर आणि लडाखमध्ये अतिशीत थंडीचा अनुभव येत आहे. अशा हवामानातही सोनम वांगचुक यांच्या खोलीचे तापमान 24 अंश असते. ते देखील कोणत्याही इलेक्ट्रॉनिक अ‍ॅप्लिकेशनशिवाय किंवा लाकूड किंवा कोळशा न जाळता.

सोनम वांगचुक यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, थंडीच्या या हंगामात दिल्लीत टी-शर्ट घालण्याची कल्पनाही कोणी करू शकत नाही. एक काळ असा होता की, लडाखमधील लोक हिवाळ्याच्या काळात दिल्लीत स्थलांतरित व्हायचे परंतु आता लडाखमध्ये ञ्च् पॅसिव्ह सौलर आणि ञ्च् अर्थ बिल्डींगमुळे वेळ बदलली आहे, बाहेरील तापमान उणे 15 डिग्री आणि आतील तापमान 24 डिग्री सेल्सिअस आहे.

सौर ऊर्जेचा चमत्कार
सोनम वांगचुक यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, पॅसिव्ह सौर आणि अर्थ बिल्डिंगमुळे मी लडाखमध्येही टी-शर्ट घातला आहे. आता लोकांना लडाखच्या हिवाळ्यापासून सुटण्यासाठी दिल्लीला जावे लागणार नाही. वांगचुक यांच्या सौर उर्जा आणि पृथ्वी इमारतीसारख्या विज्ञानाच्या प्रयोगांमुळे हा चमत्कार शक्य झाला आहे. सोनमने माती आणि लाकडासारख्या नैसर्गिक वस्तूंनी घरे बांधण्याचा खूप काळापासून आग्रह धरला आहे. याशिवाय उन्हाळी हंगामात पाण्याची उपलब्धता वाढवण्यासाठी ते स्नो स्तूपांसारखे प्रयोगही करीत आहेत.

Copy