सोनम कपूरने सोडले ट्वीटर आणि झाली ट्रोल !

0

नवी दिल्ली- आजचे युग हे सोशल मिडियाचे युग असल्याने प्रत्येक जण सोशल मिडीयाचा वापर करून स्वत:ची प्रसिद्धी करीत असतो. बॉलिवूड स्टार्स सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह दिसतात. ग्लॅमर इंडस्ट्रीत टिकायचे तर आपल्या कामाची प्रसिद्ध करायला हवी, त्यातून अधिकाधिक आपल्या पदरात पाडून घ्यायला हवे. त्यामुळे प्रत्येक स्टार्स आपला चित्रपट सोशल मीडियावर प्रसिद्ध करत असतो. सोनम कपूरही सोशल मीडियावर नेहमी अ‍ॅक्टिव्ह राहणारी अभिनेत्री आहे. पण आता ती सोशल मिडीयाला कंटाळली आहे. आता यापुढे सोनम कपूर ट्विटरवर दिसणार नाही, कारण सोनम कपूरनेट्विटर या मायक्रोब्लॉगिंग सोशल साईटपासून काही काळ ब्रेक घेतला आहे. सोनमने ट्विट करून याची माहिती दिली.

दरम्यान यावरूनही सोनम प्रचंड ट्रोल झाली. ‘बहन, कभी वापस आना ही मत…’ अशा शब्दांत युजर्सनी सोनमला ट्रोल केले. सोनमला एकता कपूरने पाठींबा दिला तर लोकांनी तिलाही ट्रोल करणे सुरु केले.

https://twitter.com/Smart_Gujju/status/1048492502557241344

Copy