सिक्कीम राज्यातील पहिल्या विमानतळाचे आज उद्घाटन

0

गंगटोक- सिक्कीम राज्याला आज पहिले विमानतळ मिळणार आहे. विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज होणार आहे. आतापर्यंत सिक्कीमला जायचे असल्यास गंगटोकपासून १२४ किलोमीटर अंतरावर असलेल्या प. बंगालमधील बागडोग्रा येथील विमानतळावर जावे लागत होते. परंतु, पाकयाँग विमानतळामुळे आता सिक्कीमही देशाच्या हवाई नकाशावर आले आहे.

देशात सर्वाधिक उंचीवर असलेल्या पाच विमानतळांपैकी हे एक आहे. हे विमानतळ देशातील 100 वे कार्यरत असलेले विमानतळ ठरेल. पर्यटनासाठी आणि सिक्कीमच्या आर्थिक विकासासाठी या विमानतळाचा फायदा होणार आहे. समुद्रसपाटीपासून 4,500 फूट उंचीवर असलेलं हे विमानतळ 201 एकर क्षेत्रावर विस्तारलं आहे. सिक्कीममधील पाकयाँग विमानतळासाठी 605.69 कोटी रुपये खर्च आला आहे. हे विमानतळ अभियांत्रिकी कौशल्याचं उत्कृष्ट उदाहरण आहे.

सिक्कीमची राजधानी गंगटोकपासून जवळपास 30 किलोमीटर अंतरावर पाकयाँग विमानतळ आहे. पंतप्रधान मोदी रविवारी संध्याकाळीच या विमानाच्या उद्घाटनासाठी गंगटोकमध्ये पोहोचले आहेत. सिक्कीम पोहोचल्यानंतर मोदींनी तेथील फोटोही ट्विटरद्वारे शेअर केले. स्पाइसजेट कंपनीने या विमानतळावरून कोलकाता येथून दररोज उड्डाणांचे नियोजन करण्यात आले आहे.