…अखेर मंत्री संजय राठोड यांनी मौन सोडले !

0

पोहरादेवी: बीड जिल्ह्यातील परली येथील तरुणी पूजा चव्हाणने पुण्यात आत्महत्या केली होती. या आत्महत्येशी शिवसेनेचे नेते मंत्री संजय राठोड यांचे नाव जोडले गेले. पूजा चव्हाणच्या आत्महत्येला मंत्री राठोड जबाबदार असल्याचे आरोप झाले. पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर म्हणजे गेल्या १५ दिवसांपासून अलिप्त असलेले मंत्री संजय राठोड आज मंगळवारी अखेर समोर आले आहे. यावेळी त्यांनी आपली भूमिका जाहीर केली. अखेर त्यांनी मौन सोडले आहे.

संपूर्ण महाराष्ट्राला ते काय बोलतात? याकडे लक्ष लागलेले होते.

माझ्या सामाजिक आणि राजकीय आयुष्य उद्धवस्त करण्यासाठी हे कट रचले गेले आहे. मला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. पूजा चव्हाण आत्महत्येशी माझा काहीही संबंध नाही. पूजा चव्हाण आत्महत्येची चौकशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लावलेली आहे. चौकशी होऊन सत्य काय? ते समोर येणारच आहे. घाणेरडे राजकारण करण्याचा प्रयत्न सुरु आहे असे मंत्री संजय राठोड यांनी यावेळी केली.

चौकशीमध्ये सत्य समोर येणारच आहे. माझी, माझ्या कुटुंबियांची, माझ्या समाजाची बदनामी थांबवा असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.

 

 

Copy