शिखर धवनचे ट्विटर अकाउंट हॅक

0

दुबई- काल झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताचा सलामीवीर शिखर धवनने दमदार कामगिरी करत शतक झळकविले. त्याच्या या शतकाची स्तुती सर्वदूर सुरु असताना, त्याच्या ट्विटर अकाऊंटवरवरून काही मेसेज क्रिकेटपटूंना गेले. या मेसेजचा साऱ्यांनाच धक्का बसला. दरम्यान अफगाणिस्तानच्या रशिद खानने ही गोष्ट लक्षात आणून दिली. त्यानंतर धवनला अकाऊंट हॅक झाल्याचे लक्षात आले.

बऱ्याच क्रिकेटपटूंनी धवनला या मेसेजबद्दल विचारले आणि हे नेमके काय झाले, हे त्याला कळत नव्हते. पण अखेर त्याला आपले अकाऊंट हॅक झाल्याचे समजले आणि त्याने ट्विटरवर एक मेसेज टाकला.

ट्विटरवर धवनने सांगितले की, ” माझ्या ट्विटर अकाऊंटवरून जर कुणाला मेसेज आलेअसतील तर कृपया ते पाहू नयेत. कारण माझे अकाऊंट हॅक झाले आहे. त्यामुळे कृपया माझ्या अकाऊंटवरून आलेले मेसेज गंभीरतेने घेऊ नका. “