शेअर मार्केटमध्ये घसरण सुरूच; घसरणीचा आकडा २ हजाराकडे

 

मुंबई: भारतीय शेअर बाजाराची आजची सुरुवातच खराब झाली आहे. शेअर मार्केटमध्ये मोठी पडझड झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. शेअर बाजार सुरु होताच मुंबई शेअर मार्केटचे निर्देशांक सेन्सेक्समध्ये १ हजारापेक्षा अधिक अंकांची घसरण झाली. घसरण सुरूच असून दुपारपर्यत १८०० अंकापर्यंत घसरण झाली आहे. सेन्सेक्स 49300 वर आहे. जागतिक बारपेठेमधील निगेटीव्हीटी अर्थात घसरण यासाठी कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.

मार्केट सुरु झाले तेंव्हा बीएसईचे सेन्सेक्स 50 हजार 256 वर होता. काल सेन्सेक्स 51 हजारांवर बाजार बंद झाला होता. दुसरीकडे नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी हा निर्देशांकही 501 अंकांनी घसरला आहे. निफ्टी 14 हजार 595 वर आहे. कालच्या तुलनेत सेन्सेक्समध्ये 3.36 टक्के तर निफ्टीमध्ये 3.34 टक्क्यांनी घसरला आहे. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स एक हजार अंकांनी घसरला होता. त्यानंतर घसरण सुरूच आहे.

आज राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयकडून भारताच्या जीडीपीसंदर्भातील आकडेवारी जाहीर केली जाणार आहे. तिसर्‍या तिमाहीमध्ये म्हणजेच ऑक्टोबर ते डिसेंबर 2020-21 मध्ये जीडीपीची किती वाढ झाली यासंदर्भातील आकडेवारी आज जाहीर होणार आहे.

Copy