मुंबईतील पावसामुळे अनेक ट्रेन रद्द

0

मुंबई : गेल्या दोन दिवसापासून मुंबईत संततधार चालू असल्यामुळे मुंबई ही तुंबापुरी झाली आहे. या पावसाचा फटका मुंबईतील लोकल तसेच अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांना बसला आहे. संततधारेमुळे मुंबई, उपनगरे, ठाणे येथील रेल्वे रुळ पाण्याखाली गेल्याने लांब पल्ल्याच्या रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मुंबईतील उपनगरीय वाहतूक थांबवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला असून लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्याही रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

रद्द करण्यात आलेल्या लांब पल्ल्याच्या गाड्या, मुंबई-मनमाड पंचवटी एक्सप्रेस. मुंबई- मनमाड राज्यराणी एक्सप्रेस. मनमाड-एलटीटी एक्सप्रेस. मुंबई-शिर्डी साईनगर एक्सप्रेस. पुणे-मुंबई सिंहगड एक्सप्रेस. पुणे-मुंबई डेक्कन क्वीन. मुंबई – सोलापूर सिद्धेश्वर एक्सप्रेस. मुंबई- चेन्नई मेल. मुंबई – भूसावळ पॅसेंजर. मुंबई- कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस. भूसावळ-पुणे एक्सप्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या असून प्रवाशांनी खाजगी वाहनांचा पर्याय निवडला आहे.

भू

Copy