सेन्सेक्सची उसळी; बँक, टेक्नॉलॉजी क्षेत्रात तेजी

0

मुंबई: मागील आठवड्यात शुक्रवारी सार्वजनिक सुटी आल्यामुळे भांडवल बाजार बंद राहिले. त्यामुळे सोमवार ते गुरुवार या चार दिवसांतच उलाढाल होऊ शकली. या चार दिवसांत मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स एकूण १,३०८.३९ अंक वधारला. दरम्यान आज सोमवारी ५ रोजी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्सने बाजार सुरु होताच उसळी घेतली. ४५० पेक्षा अधिक अंकांनी सेन्सेक्स वाढले. त्यामुळे ३९ हजाराचा टप्पा सेन्सेक्सने ओलांडला आहे. बाजार सुरु झाले तेंव्हा ४५३ अंकांनी सेन्सेक्स वाढत ३९१५० वर पोहोचले होते.

माहिती तंत्रज्ञान आणि बँकांचे शेअर वधारले आहे. टीसीएस,एचडीएफसी बँक , टाटा स्टील, कोटक बँक, इंडसइंड बँक, टेक महिंद्रा, एचसीएल या कंपन्या आणि बँकांचे शेअर तेजीत आहेत.