Private Advt

दोन दहशतवाद्यांचा खात्मा

0

जम्मू काश्मीर :- काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील द्राबगाम परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. समीर अहमद भट उर्फ समीर टायगर व अकीब खान या दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात सुरक्षा दलांना मोठे यश आले आहे. या चकमकीत दोन लष्कराचे दोन जवानही जखमी झाले असून यात एक नागरिक ठार झाला आहे.

समीर टायगर हा हिज्बुल मुजाद्दीनदचा कमांडर स्तराचा A++ दर्जाचा दहशतवादी होता. तर दुसऱ्या अकीब खान हा वरच्या फळीतील दहशतवादी होता. दोन ते तीन दहशतवादी जिल्ह्यातील द्राबगाम परिसरात लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानुसारच हा परिसर रिकामा करण्यात आला आणि शोधमोहिम हाती घेण्यात आली होती. शोधमोहिम सुरू असताना जवानांना दहशतवाद्यांना शोधण्यात यश आले. त्यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबारास सुरूवात केली होती.