राज्य सरकारमधील या मंत्र्याला पुन्हा झाला कोरोना

0

मुंबई: देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होऊ लागली आहे. वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता लॉकडाऊनची चर्चा सुरु झाली आहे. अनेक ठिकाणी लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. दरम्यान पुन्हा कोरोना होत असल्याचे प्रकरण समोर येऊ लागले आहे. महाविकास आघाडी सरकारमधील राज्यमंत्री बच्चू कडू यांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. त्यांची कोरोना चाचणी दुसर्‍यांदा पॉझिटिव्ह आली आहे. बच्चू कडू यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली असून संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वत:ची काळजी घ्यावी असे म्हटले आहे. यापूर्वी १९ सप्टेंबर २०२० रोजी बच्चू कडू यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी त्यांनी ट्वीट करून ही माहिती दिली होती. आताही त्यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे.

“माझी कोरोना चाचणी दुसर्‍यांदा पॉझिटिव्ह आली असून, सध्या मी आयसोलेशनमध्ये आहे. मागील काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वत:ची काळजी घ्यावी, आवश्यक वाटत असेल, तर स्वतःची चाचणी करून घ्यावी” असं कडू यांनी म्हटलं आहे. अचलपूर मतदारसंघाचे आमदार तथा अकोल्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता त्यांची दुसरी कोरोना चाचणी देखील पॉझिटिव्ह आली आहे.

काल माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. विशेष म्हणजे खडसे यांना यापूर्वीही कोरोना झाला होता.

मंत्री बच्चू कडू यांना १९ सप्टेंबर २०२० ला कोरोनाची लागण झाली होती, त्यावेळी केलेले ट्वीट