स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये मेगा भरती ; मिळणार 36,000 पगार

 

जनशक्ती विशेष । Sbi Recruitment 2021 ।  : बँकेच्या क्षेत्रात नोकरी शोधत असलेल्या ग्रॅज्युएट तरुण तरुणींसाठी एक सुवर्ण संधी चालून अली आहे. ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १२२६ जागांसाठी भरती निघाली आहे. बँकेने सर्कल बेस्ड ऑफिसर (cbo) च्या जागांसाठी अर्ज मागवले आहेत. पदवीधर उमेदवार या पदांसाठी ९ डिसेंबर पासून २९ डिसेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.

सखोल माहिती .

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा

सर्कल बेस्ड ऑफिसरच्या या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर असणे आवश्यक आहे. याशिवाय उमेदवारांना प्रादेशिक भाषेचे ज्ञान असावे. वयोमर्यादेबद्दल बोलायचे झाल्यास, उमेदवारांचे किमान वय 21 वर्षे आणि कमाल वय 30 वर्षे असावे. राखीव श्रेणीतील उमेदवारांना नियमानुसार वयात सवलत मिळेल.

अर्ज शुल्क
सामान्य, OBC आणि EWS श्रेणीतील उमेदवारांना 750 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. अनुसूचित जाती, जमाती आणि दिव्यांगांसाठी अर्ज विनामूल्य आहे. अर्जाची फी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे जमा केली जाऊ शकते.

वेतन :
निवडलेल्या उमेदवारांना 1 जानेवारीपर्यंत अनुसूचित व्यावसायिक बँक किंवा प्रादेशिक ग्रामीण बँकेत अधिकारी केडरमध्ये प्रदान केलेल्या सेवेच्या प्रत्येक पूर्ण वर्षासाठी एका वाढीसह रु. 36,000 चे प्रारंभिक मूळ वेतन मिळेल.

असा अर्ज करा?
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, पात्र उमेदवारांना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या www.sbi.co.in वेबसाइटला भेट द्यावी लागेल. येथे जेव्हा ते करिअर्स पर्यायावर जातील तेव्हा त्यांना करंट ओपनिंगवर क्लिक करावे लागेल. येथे तुम्हाला या भरतीची अधिसूचना आणि अर्ज भरण्याची लिंक मिळेल. आता तुम्ही अधिसूचनेत दिलेल्या पायऱ्या फॉलो करून अर्ज भरू शकता.

भरतीशी संबंधित महत्त्वाच्या तारखा

सुरुवात – 9 डिसेंबर 2021

शेवटची तारीख – २९ डिसेंबर २०२१

फी जमा करण्याची शेवटची तारीख – २९ डिसेंबर २०२१

भरती परीक्षेची तारीख – जानेवारी २०२२

प्रवेशपत्र जारी करण्याची तारीख – १२ जानेवारी २०२२

 

Recruitment advertising

https://www.sbi.co.in/documents/77530/11154687/081221-CBO-21+Final+Detailed+Advt+ENG.pdf/6d3a8188-f5a6-e9dd-98fc-e580796a0766?t=1638963781497

 

 

Recruitment online form

https://ibpsonline.ibps.in/sbircbonov21/