ऋषी कपूर उपचारासाठी अमेरिकेत

0

मुंबई-प्रसिद्ध बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर उपचारासाठी अमेरिकेला रवाना झाले आहार. ऋषी कपूर कुठल्या तरी आजाराने ग्रस्त आहेत. त्यासाठी ते अमेरिकेला रवाना झाले आहेत.

खुद्द ऋषी कपूर यांनी ट्विटरवरून याची माहिती दिली. मी उपचारासाठी अमेरिकेला जात आहे, असे त्यांनी सांगितले. असंख्य चाहत्यांनी त्यांच्या प्रकृती स्वास्थ्याची कामना केली़ अनेकांनी ते लवकर बरे व्हावेत,अशा शुभेच्छा दिल्यात.

ऋषी कपूर यांची प्रकृती दीर्घकाळापासून खराब आहे. अलीकडे आऱ के़ स्टुडिओतील गणपती विसर्जन मिरवणुकीत ऋषी कपूर सहभागी झाले होते. ६६ वर्षांचे ऋषी कपूर, अलीकडे १०२ नॉट आऊट आणि मुल्क या चित्रपटांत दिसले. लवकरच त्यांचा राजमा चावल हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात पिता-पुत्राची कथा आहे. नाराज मुलाशी संपर्क साधण्यासाठी सोशल मीडियाची मदत घेणाऱ्या पित्याची भूमिका त्यांनी यात साकारली आहे.

Copy