रोहित पवारांनी अटल बिहारी वाजपेयींच्या कवितेतून भाजपला डिवचले

मुंबई: राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. आज बुधवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे तिसरे दिवस आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चेत भाग घेतले. यावेळी आमदार रोहित पवार यांनी विधानसभेत दिवंगत पंतप्रधान भाजप नेते अटल बिहारी वाजपेयी यांच्या कवितेचे वाचन करत भाजपच्या नेत्यांना डिवचले. अटल बिहारी वाजपेयी हे भाजपचे नेते होते, मात्र त्यांच्याच विचाराचा विसर भाजप नेत्यांना पडला आहे अशा शब्दात आमदार रोहित पवार यांनी टीका केली. राज्य सरकार कोरोना, नैसर्गिक आपत्ती सारख्या संकटात आहे. या संकटात राजकारण न करता विरोधकांनी सरकारच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे असे आवाहन केले. मात्र राज्यातील भाजपचे नेते कोरोना सारख्या संकटातही राजकारण करत असल्याचे आरोप आमदार रोहित पवार यांनी केले.

बाधाएं आती हैं आएं
घिरें प्रलय की घोर घटाएं,
पावों के नीचे अंगारे,
सिर पर बरसें यदि ज्वालाएं,
निज हाथों में हंसते-हंसते,
आग लगाकर जलना होगा।
कदम मिलाकर चलना होगा।
ही कविता आमदार रोहित पवार यांनी वाचून दाखवत भाजपच्या नेत्यांवर टीका केली.

“सरकारें आएंगी, जाएंगी, पार्टियां बनेंगी, बिगड़ेंगी मगर ये देश रहना चाहिए।” ही कविता देखील आमदार रोहित पवार यांनी वाचली.

Copy