प्रभाग क्रमांक १ व २ मध्ये रस्त्याच्या कामाला सुरुवात

जळगाव – प्रभाग क्रमांक १-२ मधील भुरे मामलेदार रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. रस्त्याचे काम सुरू झालेले पाहून नागरिक उल्हासित झाले होते.

 

महाराष्ट्र सुवर्ण नगरोत्थान योजनेच्या माध्यमातून जळगाव महानगरपालिकेला विविध विकास कामांसाठी निधी मंजूर झाला आहे. या अंतर्गत गुरुवारी प्रभाग क्रमांक 1 व 2 मधील रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ झाला. यावेळी नगरसेवक दिलीप पोकळे किशोर बाविस्कर चेतन संकेत नवनाथ दारकुंडे प्रतिभा देशमुख रेश्मा काळे गायत्री शिंदे ज्योती चव्हाण व प्रभागातील नागरिक उपस्थित होते.