रिया चक्रवर्ती याने ट्रोलर्सना दिले या शब्दात सडेतोड उत्तर; अशी झाली होती ट्रोल

0

नवी दिल्ली-सध्या बिग बॉसचे १२ वे सीजन सुरु आहे. या सिजनमधील सर्वांसाठी चर्चेचा विषय म्हणजे अनुप जलोटा आणि जसलीन मथारू यांच्या रिलेशन. अनुप जलोटा आणि जसलीन मथारू एकमेकांच्या प्रेमात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे कारण जलोटा हे ६५ वर्षाचे आहेत तर मथारू ही २८ वर्षाची आहे. हे दोन्ही चांगलेच ट्रोल होत आहे. दरम्यान अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि महेश भट्ट यांच्यात देखील असेच संबंध असल्याची चर्चा दुसरीकडे सुरु आहे. मात्र याला रिया चक्रवर्ती याने सडेतोड उत्तर दिले आहे.

तिने महेश यांच्यासोबतचा आणखी एक फोटो शेअर केलाच. शिवाय ट्रोलर्सला उद्देशून इतकेच नाही तर तू कोण आहेस? असा डिवचणारा प्रश्नही विचारला.

‘तू कौन है, तेरा नाम क्या? सीता भी यहां बदनाम हुई..ट्रोल करने वालों क्या तुम लोगों को नहीं पता की, तुम जैसे हो, तुम दुनिया को भी वैसे ही देखत हो…,’ असे तिने लिहिले. रिया चक्रवर्ती भट्ट कॅम्पचा आगामी चित्रपट ‘जलेबी’मध्ये मुख्य भूमिकेत आहे.

महेश भट्ट व मुकेश भट्ट यांच्या विशेष फिल्म्स द्वारा निर्मित हा चित्रपट पुष्पदीप भारद्वाज यांनी दिग्दर्शित केलेला आहे. या चित्रपटात रेहा चक्रवर्ती, दिवांगना सूर्यवंशी आणि वरूण मित्रा मुख्य भूमिकेत आहेत. रियाने ‘मेरे डॅड की मारूती’मधून बॉलिवूड डेब्यू केला होता. ‘दोबारा’, ‘हाफ गर्लफ्रेन्ड’, ‘बँक चोर’ अशा अनेक चित्रपटांत ती दिसली आहे.

Copy